‘चांदण्यांचं झाड’ हा विविध विषयांवरील सोळा कथांचा संग्रह. विविधता आणि जिवंतपणा ही ह्या कथासंग्रहाची आद्य वैशिष्ट्ये आहेत. संग्रहातील प्रत्येक कथा हृदयाला भिडते आणि ती वाचून झाल्यानंतरही वाचकाचे मन त्या कथेपाशी रेंगाळत रहाते. कथांमध्ये कारुण्य आहे, गंभीर प्रश्न आहेत, भावभावनांचे विविध कंगोरेही आहेत. कथांची आकर्षक मांडणी, चपखल संवाद आणि मनाला भिडणाऱ्या व्यक्तिरेखा ह्यामुळे हा कथासंग्रह वाचकांच्या मनाचा ठाव घेतो. ह्या संग्रहातील कथा स्त्री, माहेर, मेनका, विपुलश्री, तनिष्का, माझी सहेली अशा विविध लोकप्रिय अंकांमधून प्रसिद्ध झालेल्या असून त्यातील काही कथा पुरस्कार पात्रही आहेत. हा कथासंग्रह ह्याआधी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित झा